Posts

प्राणायाम

प्राणायाम प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये संतुलित प्रमाणात प्रकर्षाने पाठवण्याची कला आहे. श्‍वासाद्वारे आत घेतलेला प्राणवायू फुफ्फुसाद्वारे रक्तामध्ये शोषून घेतला जातो आणि शरीरातील रक्ताभिसरण क्रियेद्वारे सर्व पेशींपर्यंत पाठवला जातो. पेशींच्या हालचालीसाठी ऊर्जाशक्ती प्राणवायूद्वारे प्राप्त होत असते. यातून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड वायू उच्छ्वासावाटे बाहेर टाकला जातो. पेशींची चैतन्यपूर्ण हालचाल प्राणवायूमुळेच शक्य होत असते.प्रत्येक पेशीचे शरीरातील विविध इंद्रियांमध्ये विशिष्ट कार्य निसर्गाने नेमून दिलेले असते. ते चांगले व्हावे, पेशी कार्यक्षम, निरोगी, चैतन्यपूर्ण राहाव्यात, यासाठी योग्य प्रमाणामध्ये प्राणवायू पोहचवणे हे प्राणायामाद्वारे साध्य होत असते. प्राणायाम करत असताना मन सहज शांत अवस्थेकडे येते. मनातील विचार चक्रांचा वेग अगदी कमी होऊन जा...

किल्ले राजगड

किल्ले राजगड राजगड सर्वात उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्‍याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. राजगडाला तीन माची व बालेकिल्ला आहे. *मार्ग :- पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा डोंगरी किल्ला असून, पुणे, भोर येथून गडावर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. कर्जत, पाली , पुणे, गुंजवणे बसस्थानकावरुन जाणाऱ्या रा.प. मंडळाच्या गाड्या किंवा खाजगी वाहन. *गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :- पद्मावती तलाव ,रामेश्वराचे मंदिर , राजवाडा , सदर , पाली दरवाज , गुंजवणे दरवाजा , पद्मावती ,माची , पद्मावती मंदिर , संजीवनी माची ,आळु दरवाजा , सुवेळा माची ,काळेश्वरी बुरुज आणि परिसर आणि बालेकिल्ला अभेद्यतेचे दुसरे रुप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव गड म्हणजे ‘राजगड’. गडावरून निसर्गाच्...

मेथी

       मेथी हि आरोग्यवर्धक वनस्पती आहे. ती पाने व बिया स्वरोपात वापरली जाते.मेथीची पाने व मोड आलेले मेथी दाने भाजी म्हणून वापरत येते. कसुरी मेथी या नावाने ओळखली जाणारी मेथी वाळलेली सुगंधित पाने विविध पदार्थात वापरली जातात. मेथीचे उत्पादन अनेक देशात घेतले जाते. भारतात मुख्यत्वे मेथीचे उत्पादन राजस्थान तेथे सर्वाधिक घेतले जाते. लोणची, रस्भाज्यात वापरली जाणारी मसाले यात मुख्यत्वे मेथीचा वापर केला जातो. अनेक भागात मेथीदाणे हे माधुमेहावारचे औषध म्हणून वापरले जाते. प्रसूती नंतरच्या काळात अर्भकाला दुध पाजणार्या स्त्रियांच्या दुधात वाढ व्हावी म्हणून त्यांच्या आहारात मेथी दाण्याचा वापर केला जातो. मेथी औषधी वनस्पती असल्यामुळे ती अक्खी किंवा चूर्ण स्वरुपात  वापरली जाते. अनेकदा आजारी व्यक्तीच्या तोंडाला चव आणण्यासाठी विविध पदार्थात वापरली जाते. मेथी वजन कमी करण्याचे उत्तम साधन आहे. रात्री अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत घालावे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास वजन कमी होते. कंबर दुखीवर चांगले औषध आहे. थंडीच्या दिवसात ड...

दैनिक पुढारी मधील माझा लेख- हेल्मेट चा विषय कट्

ते नव्हं ते हॅम्लेट सक्तीचं काय अनं नवीन झोमंट. ते खालच्या गल्लीचं 'गोट्या' चार दिस झालं रोज हॅम्लेट बगाला कोलापूरला जातंय अनं पसंत पडत नाय म्हणून परत येतंय.       पण भावा या हॅम्लेट सक्तीला आपला अनं आपल्या मंडळाचा जाहीर इरोध हाय. मी म्हणतो गाडी कुणाची...आमची!, पेट्रोल कुणाचं...आमचं!, डोस्क कुणाचं... आमचं!,  जीव कुणाचा...आमचा! मग आमच्या जीवाची दुसऱ्यासनी कशाला पाहिजे काळजी. आमचं आम्ही बघू कि. जवा पासणं कळायला लागलं तवापासणं गाडी हाय आमच्या हातात अजून एकदा बी खिरकी उठली नाय गाडीला अनं अंगाला बी. आमचं वाईट व्हावं हये इरोधकास्नी वाटतंय पण आई अंबाबाईचा आशीर्वाद अनं राजांचा वरदहस्त हाय तव्हर आमची गाडी अशीच भुंगाट जाणार. बरं ते हॅम्लेट डोसक्यात अडकवल्यावर मावा कुटन थुकायचा अनं गॉगल कसा घालायचा हे हार्ड प्रश्न हायती. या हॅम्लेट च्या नादात  'पप्या' परवा गडबडीत हॅम्लेट मधेच पिचकारी मारलं. या परसंगला कोण जबाबदार.             आम्ही घरातन बाहेर पडल्यापासनं चौकात येईपर्यंत पाच-पन्नास कार्यकर्त्या...